बातम्या

जिल्ह्यातील मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

The list of polling stations in the district is published on the website of the Collectorate


By nisha patil - 11/4/2024 8:39:29 PM
Share This News:



कोल्हापूर, दि. ११ (जिमाका): आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील २७१-चंदगड, २७२-राधानगरी, २७३-कागल, २७४-कोल्हापूर दक्षिण, २७५-करवीर, २७६-कोल्हापूर उत्तर, २७७-शाहुवाडी, २७८-हातकणंगले, २७९-इचलकरंजी व २८०-शिरोळ या १० विधानसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे, मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे व भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एका मतदान केंद्रातील १५०० मतदारापेक्षा अधिक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्राच्या बाबतीत नव्याने प्रस्तावित झालेल्या सहाय्यकारी मतदान केंद्रासह मतदान केंद्राची यादी (अनुसूची-६) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, कोल्हापूर यांच्या कार्यालयाच्या https://kolhapur.gov.in/ या संकेतस्थळावर व जिल्ह्यातील पदनिर्देशित ठिकाणी दि. 8 एप्रिल 2024 रोजी राजकीय पक्षाच्या तसेच नागरिकांच्या माहितीस्तव प्रसिध्द करण्यात आली असल्याचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी
समाधान शेंडगे यानी कळविले आहे.


जिल्ह्यातील मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध