बातम्या

'ओएमजी 2' मधील अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या लूकनं वेधलं अनेकांचे लक्ष

The look of Akshay Kumar and Pankaj Tripathi in OMG 2 caught the attention of many


By nisha patil - 3/7/2023 5:29:28 PM
Share This News:



अभिनेता अक्षय कुमारच्या  'ओएमजी 2'या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी अक्षयनं  या चित्रपटाचं एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं. आता अक्षयनं या चित्रपटाचे आणखी दोन पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामधील एका पोस्टरमध्ये अक्षय दिसत आहे तर एका पोस्टरमध्ये अभिनेते पंकज त्रिपाठी हे दिसत आहेत.'ओएमजी 2' या चित्रपटाच्या पोस्टरमधील अक्षयच्या लूकनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.  'बस कुछ दिनों में…'असं कॅप्शन या पोस्टरला अक्षयनं दिलं आहे. 

पंकज त्रिपाठी यांच्या OMG-2 या चित्रपटामधील लूकचा फोटो देखील अक्षयनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'मिलते हैं सच्चाई की राह पर' असं कॅप्शन अक्षयनं पंकज त्रिपाठी यांच्या फोटोला दिलं आहे. पंकज त्रिपाठी हे ओएमजी-2 या चित्रपटात  कांती शरण मुद्गल ही भूमिका साकारत आहेत. 'ओएमजी 2' या चित्रपटाचा टीझर देखील लवकरच रिलीज होणार आहे, अशी माहिती अक्षयनं या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन नेटकऱ्यांना दिली आहे. आता प्रेक्षक 'ओएमजी 2' या चित्रपटाच्या टीझरची उत्सुकतेने वाट बघत आहेत.


'ओएमजी 2' मधील अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या लूकनं वेधलं अनेकांचे लक्ष