बातम्या
शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा एलएलबी परीक्षेबाबत मोठा निर्णय ; हजेरी भरल्यानंतरच एलएलबी परीक्षा होणार
By neeta - 5/1/2024 4:30:27 PM
Share This News:
कोल्हापूर : हजेरी बाबतचा 70% चा निकष पूर्ण केल्यानंतरच तीन आणि पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास परवानगी देण्याचा निर्णय हा शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाने तीन दिवसांपूर्वी विधी महाविद्यालयांना केलेल्या सूचनाप्रमाणेच निर्णय झाला आहे.
अपुरे हजारे मुळे एलएलबी अभ्यासक्रमाचे कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील सुमारे 700 विद्यार्थी परीक्षा देण्यास अपात्र ठरले आहे. त्यांनी विद्यापीठाने परीक्षा देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. त्यावर या विद्यार्थ्यांना त्यांची पुढील समस्या समवेत विषम सत्र मान्य होण्याची भरवल्यास परीक्षेला बसण्यास परवानगी देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. त्यानुसार विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सूचना केली. मात्र आम्हाला विनाअट आताच्या परीक्षा देण्यास परवानगी देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.
याबाबत निर्णय घेण्यासाठी विद्यापीठाने आज व्यवस्थापन परिषदेची बैठक घेतली. त्यात कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या तरतुदीनुसार हजेरीची अट पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षे वाया जाणार नाही. पुढील सत्रात हजेरी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास परवानगी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यापूर्वी विधी महाविद्यालयातील प्राचार्य समवेत ही चर्चा करण्यात आली.
यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी विद्यार्थ्यांनी कुलसचिव डॉ. विकास शिंदे, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अजित सिंह जाधव, व्यवस्थापन परिषदेत सदस्य रघुनाथ चमकले, आमिर सिंह राजपूत यांचा समवेत सायंकाळी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी सध्याच्या सत्रात परीक्षेला बसण्यास परवानगी देण्याची मागणी केली, त्यांनी अपात्र बाबतची माहिती महाविद्यालयातून वेळेत मिळाली नसल्याची तक्रार केली. त्याबाबत उद्या शुक्रवारी विद्यार्थी प्राचार्य यांच्या समवेत एकत्रपणे व्यवस्थापन परिषदेची काही सदस्य चर्चा करणार आहेत.
शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा एलएलबी परीक्षेबाबत मोठा निर्णय ; हजेरी भरल्यानंतरच एलएलबी परीक्षा होणार
|