बातम्या

स्वातंत्र्यसैनिकांचा स्मृतिफलक पुन्हा सन्मानाने उभा

The memorial plaque of the freedom fighters stands again with dignity


By nisha patil - 6/10/2023 7:44:13 PM
Share This News:



एक ऑक्टोबर रोजी एका दैनिकात स्वातंत्र्यसैनिक कै. जगन्नाथ विनायक फडणीस यांच्या बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील निवासस्थानासमोर शासनाने लावलेला एक सन्मान फलक, गणेश विसर्जन मिरवणुकीत पडला असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. 
 

संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या व्यक्तींनी विशेष योगदान दिले हे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनामार्फतच असे सन्मान फलक त्या व्यक्तीच्या कार्याच्या स्मृती प्रित्यर्थ विशेष गौरव म्हणून त्यांच्या निवासस्थानासमोर लावण्यात आलेले होते.
     

या वृत्ताची दखल घेऊन माजी नगरसेवक ,भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर महानगर जिल्हा उपाध्यक्ष अजित ठाणेकर यांनी पुढाकार घेऊन हा फलक मोठ्या सन्मानाने पुन्हा आज उभा केला.
 कै. फडणीस सरांसोबत काम केलेले विद्यापीठ हायस्कूल चे माजी शिक्षक श्री.पी.एन. देशपांडे यांच्या हस्ते या फलकाचे पुष्पहार घालून पुनःअनावरण करण्यात आले. त्यावेळी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी सरांच्या स्फूर्तीदायक आठवणी सांगितल्या.  कडक शिस्तीचे परंतु अत्यंत प्रेमळ अशा स्वातंत्र्य सैनिक कै. फडणीस सरांसोबत अनेक स्वातंत्र्य सैनिक आपल्या विद्यापीठ हायस्कूल मध्ये घडले हे आजच्या तरुण पिढीला समजले पाहिजे. दररोज हजारो लोक या परिसरातून जात असतात परंतु दैनिक तरुण भारत संवादने प्रसिद्ध केलेले हे वृत्त खरोखरच उल्लेखनीय आहे. अशा अनेक आठवणी सोबत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अत्यंत कमी वेळात बोर्ड करून दिल्याबद्दल अतुल चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.
     

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ उद्योजक व सरांचे पुतणे सुभाष कुलकर्णी, दादा गुरगुटे, संजय गवळीयांच्यासह सरांचे माजी विद्यार्थी सीए मुकुंद भावे, सुजित खाडे, अमरीश अष्टेकर, अशोक अष्टेकर तसेच सचिन जाधव, ऋतुराज नढाळे तरुण भारत चे सौरभ मुजुमदार यांचेसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.


स्वातंत्र्यसैनिकांचा स्मृतिफलक पुन्हा सन्मानाने उभा