बातम्या

"सोहळ्यात पंतप्रधानासमोर उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख...अनेकांच्या भुवया उंचावल्या"

The mention of Uddhav Thackeray as Deputy Chief Minister in front of the Prime Minister at the ceremony


By nisha patil - 1/19/2024 11:17:22 PM
Share This News:



"सोहळ्यात पंतप्रधानासमोर उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख...अनेकांच्या भुवया उंचावल्या"
 

 "सोलापूर – आज सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात दाखल झाले आहेत. हा  लोकार्पण सोहळा सुरु असतानाच  कम्युनिस्ट नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी आपल्या भाषणात बोलताना, “माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चुकून उपमुख्यमंत्री” असा उल्लेख केल्याने व्यासपीठावरील मान्यवरांच्या भुवया उंचावल्या. 

यावेळी बोलताना आडम यांना आपली चुक लक्षात आल्यानंतर त्यांनी चूक सुधारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या प्रमुख उपस्थितीत असा प्रकार घडल्याने चर्चांना उधाण आलय."


"सोहळ्यात पंतप्रधानासमोर उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख...अनेकांच्या भुवया उंचावल्या"