बातम्या
पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता
By nisha patil - 6/28/2023 7:02:12 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम संसदेचं पावसाळी अधिवेशन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनाबाबत कॅबिनेट समितीची बैठक लवकरच होणार आहे, ज्यात संसदेच्या पावसाळी अधिवेशनाबाबत निर्णय होईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे.संसदेचं पावसाळी अधिवेशन हे 10 ऑगस्टपर्यंत चालण्याची शक्यता आहे. लवकरच पावसाळी अधिवेशनाच्या अधिकृत तारखेची घोषणा करण्यात येणार आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात यावेळी मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील ट्रान्सफर पोस्टिंगच्या प्रकरणावर उपराज्यपालांना अधिकार देणाऱ्या विधेयकाबाबत मोदी सरकारला विरोधाचा सामना करावा लागू शकतो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशभरात फिरुन भाजपविरोधी पक्षांच्या भेटी घेत आहेत आणि या प्रकरणी सर्व भाजपविरोधी पक्षांचा पाठिंबा घेत आहेत. काँग्रेसने मात्र अद्याप आपलं मत स्पष्ट केलेलं नाही, कारण अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसच्या विधेयकालाही विरोध करण्यास सांगितलं आहे.
समान नागरी कायद्याबाबत पंतप्रधान मोदींनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर संसदेत गदारोळ होऊ शकतो. इंडियन एक्स्प्रेसच्या एका वृत्तात भाजपच्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, पावसाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याचा मुद्दा सभागृहात मांडला जाऊ शकतो, ज्यावरुन गदारोळ होण्याची शक्यता आहे.
पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता
|