बातम्या
मंगल कार्यालयातच नववधुने केली हाणामारी..
By nisha patil - 2/24/2025 9:47:07 PM
Share This News:
मंगल कार्यालयातच नववधुने केली हाणामारी..
नववधूसह दोघींवर गुन्हा...
मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील सौभाग्य मंगल कार्यालयात विवाहाआधीच जमिनीच्या वादातून हाणामारी झाली. नववधू वैष्णवी संजिवकुमार बोराडे हिने भाची दिपश्री भोसलेच्या डोक्यात काचेच्या बाटलीने प्रहार केला, यात ती गंभीर जखमी झाली.दिपश्री भोसलेच्या फिर्यादीवरून नववधू वैष्णवी आणि गायत्री बोराडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक गोरे करत आहेत.
मंगल कार्यालयातच नववधुने केली हाणामारी..
|