बातम्या

रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने वनडेमध्ये धावांचा पाडलाय पाऊस

The pair of Rohit Sharma and Virat Kohli have rained runs in ODIs


By nisha patil - 1/9/2023 5:41:03 PM
Share This News:



रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने वनडेमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. या जोडीला आणखी एक विक्रम करण्याची संधी असेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने दोन धावांची भागिदारी केल्यास पाच हजार धावा पूर्ण करणार आहेत. या जोडीने आतापर्यंत 85 डावात 62.47 च्या सरासरीने 4998 धावांची भागिदारी केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये 18 शतकी भागिदारी आणि 15 अर्धशतकी भागिदारी आहेत. पाकिस्तानविरोधातील सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये पाच हजार धावांच्या भागिदारीचा विक्रम होऊ शकतो. 

शनिवारी आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे. यामध्ये टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. या दोन्ही खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत सर्वोउत्कृष्ट कामगिरी केली आहे. शनिवारी रोहित आणि विराटची जोडी पाच हजार धावांची भागिदारी करण्यापासून दोन पावले दूर आहे. दोघांची दोन धावांची भागिदारी होताच पाच हजार धावांच्या भागिदारीचा विक्रम रोहित-विराट जोडीच्या नावावर होणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा वनडे फॉरमॅटमध्ये 10,000 धावा पूर्ण करण्यापासून 163 धावा दूर आहे. हा टप्पा गाठणारा रोहित हा दुसरा वेगवान खेळाडू ठरू शकतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, जो त्याने 205 डावांमध्ये पूर्ण केला. रोहितने आतापर्यंत 237 डावात 9837 धावा केल्या आहेत.


रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने वनडेमध्ये धावांचा पाडलाय पाऊस