बातम्या
राजर्षी शाहूंच्या आश्रयामुळेच कोल्हापूर कुस्तीची पंढरी ठरली -- प्राचार्य डॉ. जे. के. पवार
By nisha patil - 5/25/2024 3:28:38 PM
Share This News:
कोल्हापूर:प्रतिनिधी लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कार्यकाळात कृषी, उद्योग, व्यापार, सहकार, कला, क्रीडा क्षेत्रास फार मोठी प्रेरणा प्रोत्साहन दिले. महाराजांनी मल्लविद्यास दिलेल्या आश्रयामुळे कोल्हापुरात बुरुजबंध मल्लांची एक पिढीच उदयास आली. कोल्हापूर हे कुस्तीची पंढरी ठरली. शाहूंच्या प्रेरणेमुळे उभारलेली मल्लविद्येची परंपरा कोल्हापुरात आजही टिकून आहे, असे मत शाहू कार्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी व्यक्त केले. राष्ट्रकुल कुस्ती संकुलाच्या उन्हाळी कुस्ती शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिद्री कारखान्याचे संचालक पैलवान पंडितराव केणे होते.
सुरुवातीला राष्ट्रकुल कुस्ती संकुलचे संस्थापक-अध्यक्ष राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते पैलवान राम सारंग यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. पवार आणि पंडितराव केणे यांच्या शुभहस्ते शिबिरार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. एक महिनाभर चाललेल्या या शिबिरामध्ये १०० विद्यार्थी मल्ल सहभागी झाले होते.
राजर्षी शाहूंनी सुरू केलेली वसतीगृहे नसती तर हजारो विद्यार्थी शिकलेच नसते. तसेच राजर्षींच्या प्रेरणेतून तालमीत उभा राहिल्या नसत्या तर माझ्यासारखी मुले पैलवानच झाली नसती, असे उद्गार पैलवान राम सारंग यांनी काढले. कुस्ती कलेला राजर्षी शाहूंनी राजर्षी दिला; आता लोकाश्रयाची गरज आहे, असे मत पंडितराव केणे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. प्रवीण पवार यांनी आभार मानले.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते एनआयएस कोच अभिषेक डोग्रा आणि कुस्ती मार्गदर्शक प्रा. अजय भोईर यांचा सत्कार करण्यात आला.
राजर्षी शाहूंच्या आश्रयामुळेच कोल्हापूर कुस्तीची पंढरी ठरली -- प्राचार्य डॉ. जे. के. पवार
|