बातम्या
राजकर्ते ही दिशाहीन आहेत त्यांचा वेळ सरकार वाचवायला जातोय - गृहराज्यमंत्री सतेज पाटील
By neeta - 2/3/2024 5:29:26 PM
Share This News:
कोल्हापूर,२ मार्च : एका बाजूला चांद्रयान पाठवू शकतात तर दुसऱ्या बाजूला मात्र पेपरफुटी प्रकरण थांबू शकत नाही हे विद्यमान सरकारची अकार्यक्षमता आहे. दिशाहीन कारभार जेव्हा असतो त्यावेळी अशा घटना घडत असतात. राजकर्ते हे दिशाहीन आहेत त्यांचा वेळ सरकार वाचवण्यात जातो. प्रशासन करण्यामध्ये नाही असे म्हणत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सरकारला टोला लगावला.
कदमवाडी येथे डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर डीपीयू मल्टी स्पेशलिटी ऑर्गन ट्रान्सप्लांट ओपीडीचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते
गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, पेपर फुटीचे प्रकरण आपण बघतोय अगदी तलाठी पासून ते सगळे पेपर फुटताना आपल्याला प्रामुख्याने दिसत आहे. एका बाजूला चांद्रयान पाठवू शकतात . दुसऱ्या बाजूला मात्र पेपर फुटी प्रकरण थांबू शकत नाही. ही विद्यमान सरकारची अकार्यक्षमता आहे. ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी हाताळल्या गेल्या पाहिजे त्या पद्धतीने या गोष्टी हा हाताळल्या जात नाहीत हे दिसत आहे. मधल्या काळात फेलोशिप संदर्भात पुण्यात पेपर झाले ते पेपर सुद्धा मागच्या वर्षीचे पेपर विद्यार्थ्यांना देण्यात आले. दिशाहीन कारभार जेव्हा असतो त्यावेळी अशा घटना घडत असतात. राजकर्ते हे दिशाहीन आहेत त्यांचा वेळ सरकार वाचवण्यात जातो. प्रशासन करण्यामध्ये नाही असे म्हणत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
राजकर्ते ही दिशाहीन आहेत त्यांचा वेळ सरकार वाचवायला जातोय - गृहराज्यमंत्री सतेज पाटील
|