बातम्या

'मैं अटल हूँ' हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

The popular movie Main Atal Hoon will soon hit the screens


By nisha patil - 11/28/2023 6:01:05 PM
Share This News:



 मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते  तसेच प्रत्येक सिनेमात त्याने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. आता पुन्हा एकदा सिनेमागृहात धमाका करण्यासाठी पंकज त्रिपाठी सज्ज आहेत. 'मैं अटल हूँ' या सिनेमाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता या सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे.

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी  यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा कवी ते राजकारणी नेता होण्यापर्यंतचा प्रवास या सिनेमात दाखवला जाणार आहे. 

पंकज त्रिपाठी यांनी सोशल मीडियावर 'मैं अटल हूँ' या सिनेमाचं एक पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसत आहे. पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"एक कवी ज्यांनी इतिहास पुन्हा लिहिला". 'मैं अटल हूँ' हा सिनेमा 19 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे". या पोस्टरवर 'हार्ट ऑफ स्टोन...मॅन ऑफ स्टील' असं लिहिलेलं दिसत आहे. 

'मैं अटल हूँ' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव  यांनी सांभाळली आहे. तर ऋषी विरमानी आणि रवी जाधव यांनी या सिनेमाचं कथानक लिहिलं आहे. भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लीजेंड स्टुडिओच्या बॅनरअंतर्गत विनोद भानुशाली, संदीप सिंह आणि कमलेश भानुशाली यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे पंकज त्रिपाठी स्टार 'मैं अटल हूँ' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. पंकज त्रिपाठी यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणार, आता फक्त सिनेमाची प्रतीक्षा, मास्टरपीस येतोय, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.'मैं अटल हूँ' या सिनेमासह पंकज त्रिपाठी यांचा 'मेरी क्रिसमस' आणि प्रभासचा 'कल्फि 2898 एडी' हा सिनेमाही 12 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 2024 मध्ये पंकज त्रिपाठी बॉक्स ऑफिस गाजवणार आहेत.


'मैं अटल हूँ' हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला