बातम्या

ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता उलथवलीच पाहिजे - उद्धव ठाकरे

The power that is feared must be overthrown Uddhav Thackera


By neeta - 12/29/2023 2:07:58 PM
Share This News:



मुंबई :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडल्याच पाहायला मिळालं  ज्या सत्तेची भीती वाटते अशी सत्ता काहीच कामाची नसते. ही सत्ता उलथवूनच टाकली पाहिजे. त्यासाठीच मी उभा आहे. मला फक्त तुमची साथ हवी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं आहे. मातोश्री येथे बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही तोफ डागली. यावेळी शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.
    पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रयत्नाने हा पक्षप्रवेश झाला. पाचोरा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, सभापती, माजी सरपंच यांनी मातोश्रीवर येऊन ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी या सर्वांशी संवाद साधत त्यांना शिवबंधन बांधलं. वैशाली पाटील आणि शिंदे गटात असलेले त्यांचे भाऊ, स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्यात मागील काही दिवसांपासून मोठा राजकीय वाद पाहिला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अत्यंत मानला जात आहे.

पुढील वर्ष लोकशाहीचं जाओ

सर्वजण मातोश्रीत आला आहात. मी तुमचं स्वागत करतो. तुम्ही आता शिवसेनेत काम करणार आहात. पण एक लक्षात घ्या. सत्तेला घाबरणार असाल तर काही उपयोग नाही. ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलण्याशिवाय पर्याय नाही. ती सत्ता बदललीच पाहिजे. त्या जिद्दीने मी उभा आहे. सत्ता ही सर्वांना आपली वाटली पाहिजे. ज्या सत्तेची भीती वाटत असेल ती उलथवलीच पाहिजे. त्यासाठी आपण काम करत आहोत. त्या कामात तुम्ही सर्व सहभागी होत आहात. तुमचं स्वागत करतो, असं सांगतानाच 1 जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होईल. नव वर्षासहीत पुढील सर्व वर्ष लोकशाहीची जाओ हीच सदिच्छा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.


ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता उलथवलीच पाहिजे - उद्धव ठाकरे