बातम्या
गेल्या महिन्याभरापासून सोन्याचे दर हे 72 हजार रुपयांच्या वर स्थिरावले होते. मात्र......
By nisha patil - 9/7/2024 6:35:42 PM
Share This News:
गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला सातत्याने झळाळी मिळालीय. गेल्या सात महिन्यात सोन्याच्या दराने उच्चांक गाठलाय. दरम्यान सोन्याचा दर प्रतितोळा 73 हजार 500 रूपयांवर गेलाय. जागतिक पातळीवर फेडरल बँक्यांचे व्याजदर कमी झाल्याने गुंतवणूकदार हे सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले आहे. परिणामी, त्याचा परिणाम हा सोन्याच्या किंमतीवर झालाय. व्याजदरात कपात होण्याच्या आशेनं अमेरिकन बाजारात हा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालाय. ग्राहकांच्या मते सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची वाढ झाल्याने अपेक्षित असलेली सोने खरेदी आता करता आली नाही, एकूण परकीय चलनाच्या साठ्यात सोन्याचा वाटा पुढील पाच वर्षांत वाढेल. सोने खरेदीच्या बाबतीत, RBI चा जगातील पहिल्या पाच मध्यवर्ती बँकांमध्ये समावेश आहे.
गेल्या महिन्याभरापासून सोन्याचे दर हे 72 हजार रुपयांच्या वर स्थिरावले होते. मात्र......
|