बातम्या

उंचगाव येथे भव्य किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात साजरा

The prize distribution ceremony of the Build a Grand Fort competition was celebrated with enthusiasm at Unchagaon


By nisha patil - 11/27/2023 10:41:16 PM
Share This News:



उंचगाव येथे भव्य किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात साजरा

करवीर तालुका शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने उंचगाव मर्यादित भव्य किल्ले बनविणे स्पर्धा आयोजित केली होती. शिवकाळ आणि शिवस्मृती आजच्या पिढीत जिवंत राहाव्यात. मुलांना आपल्या गौरवपूर्ण इतिहासाचे स्मरण राहावे व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती.  किल्ले बनविणे या स्पर्धेला मुलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 
पारितोषिक वितरण समारंभ उंचगाव येथील मंगेश्वर मंदिर येथे संपन्न झाला. 
   

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले,वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण आणि सिमेंटच्या जंगलात मुलांची मातीशी ओळख व्हावी आणि शिवाजी महाराजांचा आदर्श आणि शिवविचारांची गोडी लागावी हाच उद्देश ठेवून ही स्पर्धा आयोजित केली जात असून मुलांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बाबी वापरून किल्ले बनवले याचे मनापासून समाधान वाटत आहे.
 

या स्पर्धेमध्ये पहिला नंबर पंचरत्न तालीम मंडळ, दुसरा नंबर शिवशक्ती तरुण मंडळ, यादववाडी व तिसरा नंबर कृष्णराज म्हसवेकर, शिंदे कॉलनी यांचा आला.
    स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ३००१, २००१ व १००१ रुपये व सन्मानचिन्ह बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस सन्मानचिन्ह देण्यात आले.
   

यावेळी  दिपक रेडेकर, विक्रम चौगुले, किल्ले परीक्षक शरद माळी, शिवानंद स्वामी यांनी मनोगते व्यक्त केली. ऍड.कृष्णात माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले यावेळी विराग करी, सुनील चौगुले, योगेश लोहार, बाळासाहेब नलवडे, पै.बाबुराव पाटील, शिवाजी लोहार, आबा जाधव व स्पर्धेमध्ये 20 लहान मुलांच्या ग्रुपने सहभाग घेतलेला होता हे सर्व ग्रुप कार्यक्रम स्थळी उपस्थित होते त्यांना ट्रॉफी देऊन सहभाग ग्रुप ना गौरवण्यात आले.


उंचगाव येथे भव्य किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात साजरा