बातम्या
उंचगाव पैकी मणेरमळा मुख्य रस्त्याचा प्रश्न सोडवावा; शिवसेना नेते व विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आंबदासजी दानवे यांच्या जनता दरबारात केली मागणी.
By nisha patil - 12/2/2024 1:38:28 PM
Share This News:
उंचगाव पैकी मणेरमळा मुख्य रस्त्याचा प्रश्न सोडवावा; शिवसेना नेते व विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आंबदासजी दानवे यांच्या जनता दरबारात केली मागणी.
गेली 35 वर्षे झाली मणेरमळा मुख्य रस्त्याचा प्रश्न अजून जशास तसा आहे. यापूर्वी आम्ही शिवसेनेच्या वतीने अनेक प्रकारचे आंदोलन केली. रास्ता रोको केला, कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसलो त्यावेळी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले. परंतु यानंतरही रस्ता झाला नाही. सर्व लोकप्रतिनिधींनी निवडणुकी पुरता मतांसाठी वापर करून आम्ही आपणास रस्ता करून देतो अशी खोटी आश्वासन देऊन लोकांच्या तोंडाला पाने पुसन्याचे काम आहे. आम्ही रस्त्याचे काम पूर्ण करून देतो असे आश्वासन देण्यात आले परंतु प्रत्यक्षात 35 वर्षे झाली हा रस्ता जैसे थे आहे. यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. लोकांची दिशाभूल करण्यात आलेली आहे. कोल्हापूर पासून दोन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या भागात दहा ते पंधरा हजार लोकसंख्या आहे व ४५०० पेक्षा जास्त मतदार आहेत तरी सुद्धा आमच्या भागाला रस्ता नाही. ही अत्यंत दुर्देवाची बाब आहे. रस्ता नसल्यामुळे या भागात ये जा करण्यासाठी खूप मोठी अडचण होते. रिक्षा व बस सेवा या आत मध्ये येत नाहीत. त्यामुळे आतील नागरिकांना फार दूर चालत जावे लागते. पावसाळ्यामध्ये तर चिखलाचे पूर्ण साम्राज्य होते. आतापर्यंत सर्वच राजकीय लोकप्रतिनिधींनी या रस्त्याचा प्रश्न फक्त राजकीय फायद्या पुरता घेतला. अनेक लोकप्रतिनिधी रस्त्याच्या नावाखाली निवडून आले पण त्यांच्याकडूनही रस्ता झाला नाही.
हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागावा यासाठी शिवसेनेचे नेते व महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते मा. अंबादास दानवे यांनी जनता दरबार भरवला होता. त्यावेळी त्यांना मणेरमळा मुख्य रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा असे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपतालुकाप्रमुख दीपक पाटील व करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी दिले. यावेळी अंबादास दानवे साहेबांनी त्वरित ॲक्शन घेऊन संबंधित अधिकारी परशुराम नंदीवाले यांना बोलवून घेतले व रस्त्याची परिस्थिती जाणून घेतली. व लगेच ॲक्शन घेण्यास सांगितले यावेळी नंदीवाले यांनी लगेच ॲक्शन घेऊन खरेदी पूर्व जाहीर नोटीस काढतो असे आश्वासन दिले. तसेच अंबादास दानवे साहेबांनी रस्ता हस्तांतरित होत नाही तोपर्यंत शासनाकडून व माझ्याकडून कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास मला कळवा मी रस्त्याचा प्रश्न सुटेपर्यंत तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासन दिले.
उंचगाव पैकी मणेरमळा मुख्य रस्त्याचा प्रश्न सोडवावा; शिवसेना नेते व विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आंबदासजी दानवे यांच्या जनता दरबारात केली मागणी.
|