राजकीय
पालकमंत्र्यांनी दिवंगत खास.सदाशिवराव मंडलिकांशी केलेल्या गद्दारीचा वचपा जनता काढणार..... ॲड.सुरेशराव कुराडे....
By nisha patil - 9/11/2024 11:11:51 PM
Share This News:
पालकमंत्र्यांनी दिवंगत खास.सदाशिवराव मंडलिकांशी केलेल्या गद्दारीचा वचपा जनता काढणार..... ॲड.सुरेशराव कुराडे....
मुश्रीफांमुळे तालुक्याच्या एकसंधतेला बाधा : राजे समरजितसिंह घाटगे.......
हमिदवाडा / प्रतिनिधी दिवंगत लोकनेते खास.सदाशिवराव मंडलिक यांनी स्वतःच्या मुलाला बाजूला ठेवून पालकमंत्री मुश्रीफ यांना त्यांनी जिल्हा बँकेच्या संचालक पदापासून ते आमदार,मंत्री केले.मात्र आपल्या वडीलांसमान असलेल्या स्व.मंडलिकांच्या हमिदवाडा कारखान्याचीच निवडणूक मुश्रीफांनी लावून त्यांना उतारवयात मानसिक त्रास देण्याचे काम केले .कारखाण्याच्या निवडणुकीत प्रचारासाठी फिरत असताना त्यांच्या पायाला झालेल्या जखमा जनता अद्यापही विसरलेली नाही.त्यामुळे पालकमंत्र्यांच्या या गद्दारीचा वचपा तालुक्यातील स्वाभिमानी जनता मुश्रीफांचा पराभव करून नक्की काढणार असा ठाम विश्वास ॲड.सुरेशराव कुराडे यांनी व्यक्त केला.
हमिदवाडा (ता.कागल) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते..कुराडे पुढे बोलताना म्हणाले,25 वर्षात पालकमंत्र्यांनी केवळ जनतेच्या डोळ्यात धुळ फेकून कारभार केलेला आहे.आपण सर्वजण शिवरायांचे मावळे आहात. ज्या पद्धतीने मावळ्यांनी गनिमी काव्याने स्वराज्याचा यशस्वी लढा दिला.त्याच पद्धतीने या विधानसभेची निवडणूक देखील गनिमी काव्याने लढून राजेंना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवूया.
यावेळी राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, निवडणुका आल्या की माणसं विकत घ्यायची हा पालकमंत्र्यांचा फंडाच आहे.खरंतर निकोप लोकशाहीसाठी ही घातक बाब आहे.समाजकारण करत असताना आमचे एकमेकांशी जरूर मतभेद झाले असतील. मात्र आमच्यामध्ये मनभेद झाले नाहीत.त्यामुळे आमच्यामध्ये आपापसात जाणीवपूर्वक मतभेद निर्माण करण्यात पालकमंत्री यशस्वी होऊन ते सत्तेवर आहेत.जनतेने आता सावध होण्याची गरज आहे. आपल्या तालुक्याच्या एकसंधतेला बाधा आणणाऱ्या या स्वार्थी प्रवृत्तीला रोखण्यासाठी एकदा आम्हाला संधी द्या.तुमचा मान सन्मान वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असे सांगितले. संभाजी भोकरे,सागर कोंडेकर, शिवानंद माळी,सुधाकर गंधुगडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे प्रवीण जाधव ( लिंगनूर )आणि महाराष्ट्र कलाकार संघटनेचे अध्यक्ष अनिल मोरे यांनी व्यासपीठावर येऊन राजे समरजितसिंह घाटगे यांना आपल्या संघटनांचा पाठिंबा दिला..
यावेळी संजय चौगुले, शिवाजी मोरबाळे, रंगराव नार्वेकर, सुहास उपासे, ज्योतीराम मोगणे, समीर देसाई यांच्यासह कार्यकर्ते,पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक बी.जी.गंधुगडे यांनी केले.आभार ग्रा.पं सदस्य संदीप ठाणेकर यांनी मानले.. सुत्रसंचलन महेश जाधव यांनी केले....
भ्रष्टाचारी कुलगुरू.......
यावेळी पिंटू यादव यांनी मुश्रीफांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारी कविता सादर केली.ते म्हणाले, तीन गुरूंना फसविणारे हे कसले श्रावणबाळ, स्वयंघोषित पदव्या लावून घेण्यात पटाईत,बंद खोलीत चर्चा करण्यात माहीर,जातीयवादाचे कार्ड वापरून ते सत्तेत आलेत,ते तर भ्रष्टाचाराचे कुलगुरू....अशा आशयाच्या अत्यंत लयबध्दपणे शब्दबद्ध केलेल्या कवितेला उपस्थित सर्वांनीच टाळ्या-शिट्ट्या वाजवून प्रतिसाद दिला.
पालकमंत्र्यांनी दिवंगत खास.सदाशिवराव मंडलिकांशी केलेल्या गद्दारीचा वचपा जनता काढणार..... ॲड.सुरेशराव कुराडे....
|