बातम्या
माझी लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थींचा रॅकेट उघडकीस...
By nisha patil - 1/2/2025 3:32:16 PM
Share This News:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत चक्क परराज्यातील बोगस लाभार्थींचा रॅकेटचा प्रकार समोर आलाय. लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आहे असे दाखवून बोगस लॉगिन आयडी तयार करण्यात आले होते. आणि त्याद्वारे ११७१ अर्ज दाखल केले गेलेत. अर्ज दाखल केलेल्यांमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रहिवासी दाखल दाखवले आहेत.
हे भामटे उत्तर प्रदेश, आसाम ,पश्चिम बंगाल आणि राजस्थान मधील असल्याचे पोलीस महसूल आणि बाल महिला व बालविकास विभागाच्या तपासात समजल गेलं आहे. याबाबत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. त्याबाबत आधार लिंक असलेल्या बँक खाते तपासलं त्या बँकांच्या स्थानिक शाखेत जाऊन संबंधित खात्यांना लिंक असलेले मोबाईल क्रमांक आणि पत्ते काढले. यातील आरोपी निष्पन्न करून त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती बाळासाहेब जाधव बार्शी पोलिस ठाणे यांनी दिलीय.
माझी लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थींचा रॅकेट उघडकीस...
|