बातम्या
स्वामी विवेकानंद ट्रस्ट वतीने महिला आणि युवतींच्या मिळालेल्या राख्या तमाम सैनिकांच्या मानसिक बळ वाढवतील -
By nisha patil - 8/28/2023 6:55:01 PM
Share This News:
सुभेदार मेजर बंडू कात्रे जिल्ह्यातील 108 शाळा महाविद्यालय महिला बचत गटाकडून संकलित केलेल्या पाऊण प्रदान ' केवळ युद्धा वेळी नव्हे तर अहोरात्र देश संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या जवानांचे नेमके स्मरण ठेवून तमाम माता-भगिनींनी स्वामी विवेकानंदाचे माध्यमातून पाठवलेल्या राख्याने सैनिकांचे मनोधैर्य नक्कीच वाढणार आहे 'असे भावपूर्ण मनोगत टी ए मराठा बटालियन चे सुभेदार मेजर बंडू कात्रे यांनी व्यक्त केले .स्वामी विवेकानंद कला क्रीडा चॅरिरटेबल ट्रस्टच्या वतीने कारगिल युद्ध पासून गेली 24 वर्ष सलग पणे । सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी एक राखी ' हा उपक्रम राबवला जातो या अंतर्गत जिल्ह्यातील बारा तालुक्यामधून 108 शाळा महाविद्यालय महिला बचत गटयाच्याकडून संकलित करण्यात आलेल्यापाऊलख राख्या आज समारंभ पूर्वक टी ए बटालियन येथील महादेव मंदिर परिसरात समारंभ पूर्वक सैनिक - जवानाकडे प्रदान करण्यात आल्या . प्रारंभी सर्वांची स्वागत करत अध्यक्ष किशोर घाडगे यांनी करत पारपांरिक बंधू - भगिनी प्रेमा सह देश रक्षाबंधन ही आता एक मूल्य शिक्षणाचा भाग बनत आहे , स्वामी विवेकानंद मागणी केलेली युवती - साठी महाराणी ताराराणी लष्करी विद्यालय ही मागणी ही राज्य शासनाने मान्य केली आहे हा समस्त कोल्हापूरकरांचा गौरव आहे असे त्यांनी नमूद केली . सचिव राजेंद्र मकोटे यांनी ' आगामी वर्षात या देश रक्षाबंधनाला पंचवीस वर्षे पूर्ण होणार आहे त्या निमित्ताने भव्य कार्यक्रम घेण्याचे नियोजन आत्तापासूनच सुरू करू कोल्हापूर मधून सुरू झालेला हा उपक्रम आपण गोवा राज्यासह विदर्भ मराठवाडा ते कारवार पर्यंत सर्वत्र सुरू आहे आणि ही एक लोक चळवळ बनत आहे त्याचा सर्वांनी अभिमान बाळगावा ' असे प्रतिपादन केले . यावेळी शिवाई फाउंडेशन आणि कर्मवीर विद्यालयाच्या विधार्थी वर्गाने देशभक्तीपर गीत आणि नृत्य सादर करून कार्यक्रमाचा माहोल उत्साही बनवून टाकला. यावेळी बोलताना निवृत्त सुभेदार मेजर सैनिक लीगचे अध्यक्ष एन एम पाटील यांनी ' कोल्हापूरकरांची सैनिकांविषयी असलेली भावभावना या राखीतून प्रकट होत आहे आणि दुर्गम ते सीमेवर लढणाऱ्या जवानांना यामुळे मोठे प्रोत्साहन लाभत आहे याची व्याप्ती भविष्यात नक्कीच वाढणार आहे 'असे प्रतिपादन केले प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या डॉक्टर रेशमी बहिणी यांनी ' रक्षाबंधनातून देश आणि सामाजिक जबाबदारीचे तसेच अध्यात्मिक परंपरेचे प्रतिबिंब होत आहे या संदर्भाने अगदी व्यापकतेने राष्ट्र प्रेमाचे प्रत्येक म्हणून ही आगामी काळात देश रक्षा बंधन सोहळा संपन्न व्हावा 'अशी अपेक्षा व्यक्त केली . यावेळी शहीद महाविद्यालय टिटवेच्या वीर पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांनी सर्वांच्या वतीने जवानांना प्रत्येकात्मक राखी बांधली . त्यानंतर चाटे स्कूल , डॉक्टर श्रीधर सावंत विद्यामंदिर ,जय भारत हायस्कूल ,हिरकणी ग्रुप ,नूतन मराठी विद्यालय, राजश्री शाहू महाराज हायस्कूल बुधवार पेठ ,गर्ल स्कूल शिवाजी पेठ ,शिवाई फाउंडेशन यांच्यासह विविध संस्था संघटना महिला बचत गट तसेच शाळा महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी जवानांना राख्या बांधल्या . स्वामी विवेकानंद शिक्षण समुहाच्या कला शिक्षका सुनिता मेंगाणे यांनी यावेळी बालिकानी तयार केलेल्या राख्या व शुभेच्छा पत्रे सैनिकांना दिली . सुभेदार मेजर बंडू कात्रे सह हवालदार चिंटू चौगुले - सुनील आवटे ,सैनिक नवनाथ राव यांनाही यावेळी उत्साही वातावरणात प्रतिकात्मक राख्या बांधण्यात आल्या . पाहुण्यांचे स्वागत ट्रस्टचे विश्वस्त महेश कामत ,कमलाकर किलकिले ,अशोक लोहार , विपुल भंडारे , डॉक्टर सायली कचरे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पक्षी मित्र धनंजय रूप नाना नाम जोशी यांनी केले या सोहळ्यास मैत्री फौंडेशनच्या माधुरी नकाते , वारंगला सखी संघटनेचे उमेश निरंकारी, मालोजी केरकर माजी सैनिक लीगचे एस एस माने , प्रकाश खोजगे गंडमाळे यांच्यासह शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .
स्वामी विवेकानंद ट्रस्ट वतीने महिला आणि युवतींच्या मिळालेल्या राख्या तमाम सैनिकांच्या मानसिक बळ वाढवतील -
|