बातम्या

खरे किंगमेकर पी एन पाटीलच - धनंजय महाडिक

The real kingmaker is PN Patil Dhananjay Mahadik


By nisha patil - 5/6/2024 4:58:18 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांचा विजय झाला आणि श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले. पण निवडणूक निकालानंतर विधानसभानिहाय प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीमुळे कोल्हापूर जिल्ह्याचे किंग मेकर म्हणणाऱ्या नेत्याचे पितळ उघडे पडले आहे. कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघ जणू आपल्याच मालकीचा आहे अशा अविर्भावात वावरणाऱ्या या नेत्याला कसेबसे वीस हजारांचे मताधिक्य महाराजांना देता आले. याउलट पी एन पाटील यांनी अर्ज भरण्या दिवशीच सांगितल्याप्रमाणे तब्बल 71 हजारांचे सर्वाधिक मताधिक्य आपल्या करवीर विधानसभा मतदारसंघातून मिळवून दिले. दुर्दैवाने हा विजय पाहण्यासाठी ते आज आपल्यात नाहीत पण निश्चितच कोल्हापूर जिल्ह्यातील खरे किंगमेकर पी एन पाटील ठरले असेच म्हणावे लागेल!


खरे किंगमेकर पी एन पाटीलच - धनंजय महाडिक