बातम्या
या महाविद्यालयाची शैक्षणिक संस्थांची मान्यता रद्द केली जाणार...
By nisha patil - 5/8/2024 9:20:58 PM
Share This News:
राज्य शासनाने मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला आहे, असं असतानाही अनेक महाविद्यालयांमध्ये मुलींना शिक्षण देण्यात अनेक अडचणी येत आहेत.व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास, इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी याबद्दल शासन निर्णय जारी करण्यात आला. मात्र तरीही महाविद्यालयाकडून या निर्णयाचे पालन केले जात नव्हते. आता याबद्दल उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. मुलींना मोफत शिक्षणाच्या निर्णयाचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयाची शैक्षणिक संस्थांची मान्यता रद्द केली जाणार आहे, असे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
मुलींना मोफत शिक्षण देताना महाविद्यालयाकडून होणारा त्रास तसेच अडचणी यासंदर्भात मी अभ्यास करत आहे. मुलींच्या अडचणी कळाव्यात म्हणून लवकरच टोल फ्री क्रमांक जाहीर केला जाणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.अनेक पर्याय उपलब्ध करूनही जे महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्था मुलींकडून फी आकारत असतील यांच्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन केले जाणार आहे. यात माझ्यासह दहा अधिकाऱ्यांचा समावेश असेल. या टास्क फोर्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये महाविद्यालय तसेच शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या जातील. जर या अडचणीत दुरुस्त झाल्या नाही तर जागेवरच महाविद्यालयाची मान्यता रद्द केली जाईल, असा इशारा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.
या महाविद्यालयाची शैक्षणिक संस्थांची मान्यता रद्द केली जाणार...
|