बातम्या
मराठा मतांचा ध्रुवीकरणचा परिणाम,तायवाडेंनी जातनिहाय आकडेवारी सांगितली!
By nisha patil - 6/6/2024 9:52:02 PM
Share This News:
महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतून खासदार म्हणून सर्वाधिक वाटा मराठा समाजाला मिळाला आहे
राज्यातील निवडून आलेल्या 48 खासदारांची यादी तपासली तर त्यामध्ये तब्बल 26 मराठा खासदारांचा समावेश आहे. तर फक्त 9 खासदार हे ओबीसी समाजातील आहेत. 6 खासदार अनुसूचित जातीचे, 4 खासदार अनुसूचित जमातींचे, तर 3 खासदार खुल्या वर्गातील असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील गेल्या काही महिन्यातील राजकीय वातावरण, मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन आणि त्यामुळे झालेला मराठा मतांचा ध्रुवीकरण याचा हा परिणाम आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा जो आंदोलन झाला. त्याचा परिणाम निश्चितच निवडणुकीवर झाला आहे... आणि त्या आंदोलनामुळे ओबीसी ही संपूर्ण महाराष्ट्रभर एकवटला गेला. त्यामुळेच विदर्भ आणि कोकणात ओबीसी खासदार निवडून आले, असे मतही तायवाडे यांनी व्यक्त केले.
मराठा मतांचा ध्रुवीकरणचा परिणाम,तायवाडेंनी जातनिहाय आकडेवारी सांगितली!
|