बातम्या

थंडीत या आजारांचा वाढतो धोका, असा करा स्वत:चा बचाव

The risk of these diseases increases in the cold


By nisha patil - 11/27/2023 8:29:34 AM
Share This News:



मधुमेह ज्या प्रमाणे आता लोकांमध्ये झपाट्याने वाढत आहे तसेच उच्च रक्तदाबाची समस्याही लोकांसाठी सामान्य झाली आहे. बिघडलेली जीवनशैली याचे मुख्य कारण आहे. त्यामुळेच आता तरुणांनाही हाय बीपी, मधुमेह सारख्या समस्या दिसू लागल्या आहेत.

थंडी सुरु झाली की आजारपण डोकं वर काढतात. कारण वातावरणात एक मोठा बदल होत असतो. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज असते. थंडीत उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो असं डॉक्टरांचं मत आहे.

थंडीत रक्तवाहिन्या आणि हृदयावर जास्त दाब पडतो त्यामुळे रक्तदाब वाढतो. आहारातील बदल आणि हिवाळ्यात शारीरिक हालचाली कमी असल्याने देखील ही समस्या उद्भवते. उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही काही सुपरफूड्स वापरू शकता. ज्यामुळे तुमचा बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

अश्वगंधा

अश्वगंधा अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. रक्तदाबाची समस्या असेल तर त्यावरही ती खूप फायदेशीर ठरते. ज्या लोकांना वजन वाढणे किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास होतो त्यांनी त्यांच्या आहारात अश्वगंधाचा अवश्य समावेश करावा. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा अश्वगंधा पावडर एक ग्लास पाण्यासोबत घेऊ शकता.

लसूण

लसणाचा वापर अनेक घरगुती उपचारांमध्येही केला जातो. रक्तदाबाची समस्या असल्याने दररोज लसूणची एक पाकळी खावी. यामुळे बीपीची समस्या दूर होते.

पिस्ता

पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट यांसारखे अनेक घटक पिस्त्यात आढळतात. जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या समस्येमध्ये याचा वापर करणे खूप फायदेशीर ठरू शकते.

मेथी

मेथीचे दाणे स्वयंपाकघरात हमखास असतात. पण हीच मेथी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात मेथी शरीर उबदार ठेवते. मेथीमध्ये विद्राव्य फायबर मुबलक प्रमाणात आढळते, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. याशिवाय शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलही कमी करते.


थंडीत या आजारांचा वाढतो धोका, असा करा स्वत:चा बचाव