बातम्या

बिग बॉस मराठीचा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज

The season of Bigg Boss Marathi is ready to meet the audience


By nisha patil - 7/23/2024 9:55:26 PM
Share This News:



 दोन वर्षांपासून प्रेक्षकांना बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची उत्सुकता लागली होती. नव्या रुपात, नव्या ढंगात बिग बॉस मराठीचा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. यंदाच्या सीझनचा होस्ट म्हणून अभिनेता रितेश देशमुख दिसणार आहे. तर, दुसरीकडे यंदाच्या सीझनमधील स्पर्धकांच्या नावाची उत्सुकता वाढली आहे.  'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक असणार याची चर्चा सुरू झाली आहे. बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या संभाव्य स्पर्धकांच्या नावावर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.
 

बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्यांमध्ये अनेकांच्या नावाच्या चर्चा सुरु आहे. यामध्ये मराठी-हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या नावाची चर्चा आहे.  अभिनेता विवेक सांगळे आणि चेतन वडनेरे हे दोघेही बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडिया स्टार अंकिता वालावलकर ही देखील बिग बॉसच्या घरात जाऊ शकते असे म्हटले जात आहे. त्याशिवाय, एक गायक आणि एक प्रसिद्ध डान्सर-अभिनेत्रीदेखील बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे.


बिग बॉस मराठीचा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज