बातम्या

शिंदे गटाच्या उमेदवारांची दुसरी यादी आजच होणार जाहीर

The second list of Shinde group candidates will be announced today


By nisha patil - 3/4/2024 7:22:24 PM
Share This News:




शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठ उमेदवारांची पहिली यादी यापूर्वी जाहीर केली असून, उरलेल्या उमेदवारांची यादी आज जाहीर केली जाणार असल्याची माहिती संजय शिरसाट  यांनी दिली आहे. त्यामुळे कुणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 
 

याबाबत बोलतांना शिरसाट म्हणाले की, "उद्या दुसऱ्या टप्प्याची अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. राहिलेल्या नावांची घोषणा आज करण्यात येईल. आमच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे, कुणी नाराज होऊ नये म्हणून सामावून घेऊन नंतरच घोषणा करणार आहे. कोकणची जागा आम्हाला हवी असून, आग्रह आहेच. मात्र, नारायण राणे आमचे शत्रू नाही, याबाबत दोन्हीं पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील. आज दुपारपर्यंत निर्णय होईल असे शिरसाट म्हणाले. बच्चू कडू यांच्या वक्तव्याला महत्व  मुख्यमंत्री शिंदे साहेब सर्वसामान्य कुटुंबातून आहे, अनेक संकटांना त्यांनी तोंड दिले आहे. मोदी साहेब, शाह साहेब त्यांना मदत करतात. काही लोक जे काही बोलतात त्यात शिंदे साहेब समंजस भूमिका घेताय. आम्हाला भाजप दाबतेय का, आमचा बळी घेणार का? या सगळ्या चर्चा दुर्दैवी आहे. बच्चू कडू साहेबांनी भावना व्यक्त केल्या असाव्यात, मात्र मात्र, नारायण राणे आमचे शत्रू नाही, याबाबत दोन्हीं पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील. आज दुपारपर्यंत निर्णय होईल असे शिरसाट म्हणाले. 


शिंदे गटाच्या उमेदवारांची दुसरी यादी आजच होणार जाहीर