बातम्या

महेंद्रसिंह धोनीच्या कसोटीतील तडकाफडकी निवृत्तीचं गुपित समोर

The secret of Mahendra Singh Dhoni s hasty Test retirement is revealed


By nisha patil - 10/4/2024 6:51:38 PM
Share This News:



यंदाच्या आयपीएलच्या 17 व्या पर्वात महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपदावरुन पायउतार होत ही जबाबदारी मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्याकडं दिली आहे. महेंद्रसिंह धोनीनं अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. धोनीच्या या निर्णयामुळं सर्वांना धक्का बसला होता. धोनीच्या तडकाफडकी निवृत्तीचं कारण समोर आलं नव्हतं. आता मात्र धोनीची पत्नी साक्षी  हिचा एक  व्हिओ व्हायरल होतं. त्यामध्ये महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीचं कारण साक्षी सांगाताना दिसत असून तिनं यासंदर्भातील कारण देखील सांगितलं आहे. 
 

साक्षी धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती म्हणते की "जेव्हा आम्ही जीवा संदर्भात विचार केला तेव्हा मी धोनीला सांगितलं होतं की एक मुलं हवं असेल तर किमान एका फॉरमॅटमधून निवृत्ती घ्यावी लागेल. तुमच्याकडे मुलासोबत आनंद घेण्यासाठी वेळ राहायचा नाही." साक्षी पुढे म्हणते की. "जेव्हा जीवाचा जन्म झाला तेव्हा रुग्णालयातील लोक म्हणत होते की तुझे पती आले नाहीत, त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की पतीची प्राथमिकता क्रिकेट आहे,आणि माझी प्राथमिकता धोनी आहे, अशावेळी जी त्यांची प्राथमिकता असेल तिच माझी असेल."
 

महेंद्रसिंह धोनीनं 30 डिसेंबर 2014 ला कसोटीतून निवृत्ती घेतली होती. एकदिवसीय क्रिकेटमधून टीम इंडियाचं कॅप्टनपद एम.एस. धोनीनं 2017 मध्ये सोडलं. 2019 मध्ये वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सेमी फायनलच्या मॅचनंतर त्याचं वनडे करिअर संपुष्टात आलं. धोनीनं ऑगस्ट 2020 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. महेंद्रसिंह धोनीचं यंदाचं हे शेवटचं आयपीएल असल्याच्या चर्चा देखील सुरु आहेत. 
 

धोनीच्या नावावर आयसीसीच्या तीन ट्रॉफी महेंद्रसिंह धोनीनं 2007 मध्ये आयसीसी टी-20 वर्ल्ड कप भारताला जिंकून दिला होता. त्यानंतर 2011 मध्ये आयसीसी वर्ल्ड कप भारताला धोनीनं मिळवून दिला होता. यानंतर 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला धोनीच्या नेतृत्त्वात विजय मिळाला होता. याशिवाय भारताला 2010 आणि 2016 मध्ये धोनीनं भारताला आशिया कप देखील मिळवून दिला होता.  


महेंद्रसिंह धोनीच्या कसोटीतील तडकाफडकी निवृत्तीचं गुपित समोर