बातम्या

‘छावा’चे शूटिंग पूर्ण

The shooting of Chhava is complete


By nisha patil - 12/29/2023 12:23:36 PM
Share This News:



छावा’चे शूटिंग पूर्ण

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘छावा’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये विकी कौशल प्रमुख भूमिका साकारणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले. विकी कौशलने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासोबतचे फोटो शेअर करून याबाबतची माहिती दिली. ‘आपल्या करीअरचा सर्वात मोठा अॅक्शन सिक्वेन्स पूर्ण करून सरत्या वर्षाला निरोप देत आहे,’ अशी कॅप्शन विकीने फोटोला दिली आहे.

ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ 6 डिसेंबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये रश्मिका मंदना हिची प्रमुख भूमिका आहे. विकी कौशलच्या कामाबद्दल सांगायचे तर त्याने लक्ष्मण उतेकर यांच्या ‘जरा हटके जरा बचके’मध्ये काम केले होते. या चित्रपटात सारा अली खानदेखील होती. विकीने ‘सॅम बहादूर’ या बायोपिकमध्ये दमदार अभिनय केला आहे. हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला.


‘छावा’चे शूटिंग पूर्ण