बातम्या

तरुणीची नोकरी घालवण्यासाठी चक्क दुकानच पेटवल

The shop was set on fire to destroy the young womans job


By nisha patil - 8/5/2024 5:41:51 PM
Share This News:



तहसील पोलीस ठाण्याच्या बोहरा मशीद गल्ली परिसरात रितेश सुदामा मकीजा यांचे स्टेशनरीचे दुकान आहे. रितेश 30 एप्रिलच्या रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतर 1 मे रोजी सकाळीच्या सुमारास दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एका व्यक्तीने रितेश यांना फोन करून दुकानातून धूर निघत असल्याची माहिती दिली. त्यानंतर रितेश यांनी तात्काळ दुकान गाठले आणि  या बाबतची माहितीही अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने दुकानाकडे धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत या आगीत सात लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते. 
 

 नागपूरच्या  तहसील पोलीस ठाण्यांतर्गत बोहरा मशीद गल्ली परिसरात ही घटना घडलीय. मात्र हे कृत्य करण्यामागील कारणही तितकेच आश्चर्यकारक आहे. प्रेयसीशी ब्रेकअप झाल्यानंतर राग अनावर झाल्याने तिला धडा शिकविण्यासाठी आणि तिची नोकरी घालवण्यासाठी या तरुणाने हे पाऊल उचलले आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे उलगडताना यातील संशयित आरोपीला अटक करून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. मात्र, या आगीत दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले आहे.


तरुणीची नोकरी घालवण्यासाठी चक्क दुकानच पेटवल