बातम्या
'आदिपुरुष' सिनेमातील 'राम सिया राम' गाण्याला युट्यूबवर अल्पावधीतच मिळाले मिलियन व्ह्युज
By nisha patil - 5/29/2023 8:06:05 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम आदिपुरुष' या बहुचर्चित सिनेमातील 'राम सिया राम' हे गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. रिलीज होताच हे गाणं युट्यूबवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या गाण्याचे बोल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या गाण्याला एका तासात 1.2 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत.
आदिपुरुष' सिनेमातील 'राम सिया राम' हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाण्याच्या बोलपासून संगीतापर्यंत सर्व गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या भक्तिमय गीताचे बोल लोकप्रिय गीतकार मनोज मुंतसिर शुक्ला यांनी लिहिले आहेत. तर सचेत टंडन आणि परंपरा टंडनने हे गाणं गायलं आहे.
'राम सिया राम' या गाण्यात राम आणि सीता यांच्यातील प्रेम दाखवण्यात आलं आहे. टी-सीरिज या युट्यूब चॅनलवर हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. प्रभासने हे गाणं शेअर करत लिहिलं आहे,"आदिपुरुष'चा आत्मा".
'आदिपुरुष' सिनेमातील 'राम सिया राम' गाण्याला युट्यूबवर अल्पावधीतच मिळाले मिलियन व्ह्युज
|