बातम्या

उदे ग आई उदे.. चा जयघोषात सौंदती भाविकांनी फुलली

The sound of the devotees swelled with the cheers of Ude Ga Ai Ude


By Administrator - 12/26/2023 5:58:43 PM
Share This News:



उदे ग आई उदे.. चा जयघोषात सौंदती भाविकांनी फुलली 

रेणुका देवी यात्रा जमले लाखो भाविक

बेळगाव : ऊदे ग आई उदे आणि भंडाराच्या जयघोषात आज सौंदतीचा डोंगर भाविकांनी दुमदुमला. कोल्हापूर सह कर्नाटक व महाराष्ट्रातील डोंगरावर यल्लमा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.
   

काल यात्रेच्या मुख्य दिवशी महाराष्ट्र ,तामिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा व बेळगाव जिल्ह्यातील चार लाखाहून अधिक अधिक भाविक  डोंगरावर दाखल झाले होते. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या यात्रेला दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे संपूर्ण डोंगर परिसर गर्दीने फुलून गेला होता. परंपरेप्रमाणे पडल्या भरण्याचा कार्यक्रम करण्यासह इतर विधी सुरू होते.
 

आज डोंगरावर अभिषेक होम हवन विशेष पूजा व आरती झाल्यानंतर कंकण मंगळसूत्र विसर्जनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यामध्ये भाविकांनी मोठ्या श्रद्धेने भाग घेतला. दुपारी नैवेद्य दाखवून पडल्या भरण्यात आल्या. यावेळी भाविकांच्या उदो ग आई उदो च्या जयघोषाने अवघा डोंगर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला होता. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता देवीची पालखी घालण्यात आली व रात्री बारा वाजता भाविक परतीच्या वाटेला लागले व सकाळपर्यंत डोंगर रिकामा झाला.
   

यात्रेच्या काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त येणार करण्यात आला होता. डोंगरावर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने भाविकांना पाणी निवास आणि स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात आली आहेत, माझे एकाच वेळी गर्दी झाल्याने भाविकांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले


उदे ग आई उदे.. चा जयघोषात सौंदती भाविकांनी फुलली