बातम्या
डॉक्टर दाम्पत्यात पेटलेल्या वादाच्या ठिणगीने घेतलं भयानक वळण;
By nisha patil - 1/29/2024 9:03:37 PM
Share This News:
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत घरगुती वादानंतर महिलेने रागाच्या भरात स्वत:च्याच घराला आग लावून ते पूर्णपणे जाळून टाकले. डॉक्टर दाम्पत्यामधील भांडणाने शेवटचं टोक गाठल्यानंतर संतापलेल्या पत्नी घराला आग लावून तिथून निघून गेली.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ठाकरे नगरमधील एका घरातून आगीचे लोट बाहेर पडताना दिसत होते, त्यानंतर स्थानिक लोकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणली आणि तपासादरम्यान त्या घरात राहणाऱ्या डॉक्टर पती-पत्नीमध्ये रविवारी रात्री भांडण झाल्याची माहिती समोर आली.
यानंतर पत्नीने स्वतः घराला आग लावली आणि तेथून निघून गेली. ही आग रात्रभर पसरली आणि सकाळपर्यंत सर्व काही जळून खाक झाले. या घटनेचा तपास मुकुंदवाडी पोलीस करत आहेत.
डॉक्टर दाम्पत्यात पेटलेल्या वादाच्या ठिणगीने घेतलं भयानक वळण;
|