बातम्या

राज्याला पुन्हा अवकाळी पाऊसाचा तडका बसण्याची शक्यता

The state is likely to be hit by unseasonal rain again


By nisha patil - 11/23/2023 6:20:31 PM
Share This News:



राज्याला पुन्हा अवकाळी पाऊसाचा तडका बसण्याची शक्यता आजपासून राज्यात पुढील 4-5 दिवस पावसाचा अंदाज  भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

महाराष्ट्राला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे, उद्यापासून राज्यात पुढील 4-5 दिवस पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात  पावसाची शक्यता आहे. तर 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच मुंबईत पावसाचा अंदाज असल्याने हवा गुणवत्ता पातळी चांगली होण्याची अपेक्षा वक्त केली जात आहे
    तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता तर उत्तर महाराष्ट्रात देखील विजांच्या गडगडाटासह पाऊस असेल. सोबतच, उत्तर महाराष्ट्रात अगदी तुरळक ठिकाणी गारा पडण्याची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे आता रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांचा पुन्हा अवकाळीशी सामना होणार हे नक्की..


राज्याला पुन्हा अवकाळी पाऊसाचा तडका बसण्याची शक्यता