बातम्या

पावसाळी अधिवेशनात राज्य सरकाकरला घेरणार : आ. सतेज पाटील

The state will surround Sarkakar in the monsoon session A Satej Patil


By nisha patil - 10/7/2023 5:07:04 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : येत्या 17 जुलैला  विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. राजकीय उलथापालथीनंतर होणारे हे पहिले पावसाळी अधिवेशन होत आहे  त्यामुळं विविध प्रश्नांवरून हे अधिवेशन गाजण्याच शक्यता आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या अधिवेशनात जनतेचे प्रश्न घेऊन काँग्रेस शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरणार असल्याचं सांगत सांगत राज्य सरकारवर टीका केली आहे.  सध्या राज्यातील उद्योगधंदे परराज्यात जात आहेत, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. म्हणून जनतेने आम्हाला दिलेला विरोधी पक्षाचा कौल सार्थ ठरवण्यासाठी लोकांचे प्रश्न राज्याच्या सर्वोच्च सभागृहात मांडण्यासाठी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहेत. सर्व आघाड्यांवर राज्यातील शिंदे -फडणवीस-पवार राज्य सरकार अपयशी ठरले असल्याची टीका आमदार पाटील यांनी केलीय.


पावसाळी अधिवेशनात राज्य सरकाकरला घेरणार : आ. सतेज पाटील