बातम्या

राज्याचं हिवाळी अधिवेशन 10 दिवसांत गुंडाळण्याची चिन्हं

The states winter session signs to wrap up in 10 days

By nisha patil - 10/21/2023 4:07:23 PM
Share This News:

 महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं  तात्पुरतं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 7 डिसेंबर ते 20 डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र यंदाचं हिवाळी अधिवेशन अवघ्या 10 दिवसांत गुंडाळलं जाण्याची शक्यता आहे.

दरवर्षी हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपते मात्र या वर्षी अधिवेशन 20 डिसेंबर म्हणजे बुधवारीच गुंडाळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला दोन दिवसांची कात्री लागनार  
     हिवाळी अधिवेशनाच्या 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान दहा दिवसाच्या कामकाजाची तात्पुरती दिनदर्शिका जाहीर झाली आहे. म्हणजे 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचे कामकाज 20 डिसेंबरपर्यंतच नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे 20 तारखेलाच अधिवेशन गुंडाळलं जाणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

राज्याचं हिवाळी अधिवेशन 10 दिवसांत गुंडाळण्याची चिन्हं