बातम्या

राज्यातील ९ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा दर्जा वाढणार

The status of 9 subregional transport offices in the state will be increased


By nisha patil - 6/23/2023 4:22:49 PM
Share This News:



नागपूर : परिवहन विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील ९ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा दर्जा वाढवून प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) रुपांतर करण्यात आले. यात विदर्भातील चंद्रपूर व अकोल्याचाही समावेश आहे.

विशेष म्हणजे, संबंधित कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कार्यालय प्रमुख म्हणून घोषीत करण्यात आल्याने हे प्रमोशन का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यातील पिंपरी -चिंचवड, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, वसई (जि. पालघर, अकोला, बोरीवली (मुंबई) व सातारा येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांचे दर्जामध्ये वाढ करुन प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर करण्याचा निर्णयाला शुक्रवारी शासनाने मान्यता दिली. या निर्णयाने नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणारे चंद्रपूर व गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वेगळे झाले.


राज्यातील ९ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा दर्जा वाढणार