बातम्या
शेतकरी संघाला वाचवण्यासाठीकट्टर विरोधक एकत्र?
By nisha patil - 1/15/2024 6:29:21 PM
Share This News:
कोल्हापूर : कार्यकर्त्यांनो, आम्ही सत्तेसाठी भांडत असलो तरी सत्तेसाठीच एकत्र सुद्धा येऊ शकतो असा सकारात्मक (?) संदेश आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आप आपल्या गटाला दिला आहे. तथापि दोघांच्याही कार्यकर्त्यांना त्याचा जोरदार धक्का बसला आहे. आम्ही एकमेकाची डोके फोडायची, गट मजबूत करायचा आणि त्यांनी एकत्र यायचे. याचसाठी अट्टहास केला होता का आम्ही? अशा प्रतिक्रिया व्यक्त न झाल्या तर नवलच! हे दोघे एकत्र आल्याने सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते चकित झाले आहेत.
अडत व्यापारी तात्यासाहेब मोहिते यांच्या पुढाकाराने शेतकरी सहकारी संघाची स्थापना झाली. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी संस्था अशी त्यांनी संघाची ओळख करून दिली. संघामध्ये नोकरी मिळावी म्हणून एकेकाळी वशिल्याचे राजकारण मोठ्या प्रमाणावर चालायचे. याच वैभवाच्या शिखरावर असलेल्या शेतकरी सहकारी संघाला उतरती कळा लागली.
शेतकरी संघाचा”बैल”केव्हाही बसू शकतो अशी या संघाची आजची स्थिती असताना या संघावर सत्ता काबीज करण्यासाठी जिल्ह्याच्या राजकारणातील मातब्बर मंडळी एकत्र आली आहेत.
संघाला पुन्हा बळकटी आणण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, भाजप, जनसुराज्य शक्ती पक्ष यांना एकत्र आणून राजश्री शाहू शेतकरी विकास पॅनल तयार केले आहे. आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार पी एन पाटील, विनय कोरे आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे संघाच्या बळकटीकरणासाठी एकत्र आले आहेत. त्यांनी पॅनल तयार केले आहे. सतीचे पाटील आणि धनंजय महाडिक हे कालचे मित्र आणि आजचे कट्टर शत्रू आणि उद्याचे पुन्हा मित्र असे घडू शकते? यालाच राजकारण असे नाव म्हणता येईल?
शेतकरी संघाला वाचवण्यासाठीकट्टर विरोधक एकत्र?
|