बातम्या

क्रिकेटपटूच्या अचानक जाण्यानं पन्हाळ्यात हळहळ..

The sudden departure of the cricketer caused a stir in Panhala


By nisha patil - 3/21/2024 5:36:16 PM
Share This News:



पन्हाळा : प्रतिनिधी वाघवे ता.पन्हाळा येथील अष्टपैलू क्रिकेटपटू शशिकांत कृष्णात यादव (वय ३२) याचा हदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक मृत्यू झाला. वाघवे स्पोर्ट्सचा हरहुन्नरी एकहाती सामना फिरवणारा अष्टपैलू खेळाडू हरपल्याने वाघवे परिसरासह पन्हाळा तालुक्यात आणि क्रिकेट प्रेमीतून हळहळ व्यक्त होत आहे. शशिकांतला क्रिकेटचा छंद असल्याने तो नेहमी क्रिकेट खेळत होता. वाघवे स्पोर्ट्सचा तो अष्टपैलू क्रिकेटपटू होता.

क्रिकेटची आवड असल्याने शशिकांतने क्रिकेटला जणू वाहूनच घेतले होते. त्यामुळे त्याची जिल्ह्यात क्रिकेटपटू म्हणून ओळख निर्माण झाली. एकहाती सामना फिरवणारा खेळाडू फलंदाज आणि वेगवान गोलंदाज म्हणून शशिकांतला ओळखले जावू लागले.कोतोलीच्या नेहरू स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या क्रिकेट स्पर्धेत शशिकांत उत्कृष्ट खेळला होता. संपूर्ण स्टेडियमवर लोकांची त्याने वाहवा मिळविली होती. यामुळे तो कोतोलीच्या मैदानावर लोकांच्या गळ्यातील ताईत बनला होता.
 दरम्यान मंगळवारी सकाळी अचानक शशिकांतच्या छातीत दुखायला लागल्याने त्याला उपचारासाठी
खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा
रुग्णालयातच मृत्यू झाला. ही बातमी पन्हाळा तालुक्यात क्रिकेटपटू च्यात वार्यासारखी पसरताच एकच सन्नाटा पसरला..  शशिकांतच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. कोतोली येथील सामना त्याचा अखेरचा ठरला.


क्रिकेटपटूच्या अचानक जाण्यानं पन्हाळ्यात हळहळ..