बातम्या
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचे उद्दीष्ट ८२ दिवसांत पूर्ण
By nisha patil - 2/27/2025 8:06:57 PM
Share This News:
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचे उद्दीष्ट ८२ दिवसांत पूर्ण
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या १०० दिवसांत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत १.२५ लाख लाभार्थी करण्याचे व ५०० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्ट महावितरणने अवघ्या ८२ दिवसांत पूर्ण केले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी दिली.
ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू केली होती. नागपूर जिल्हा लाभार्थी संख्येत पहिल्या स्थानी असून, त्यानंतर पुणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यांचा क्रम लागतो. योजनेअंतर्गत घरांच्या छतांवर सौर प्रकल्प बसवून वीजनिर्मिती केली जाते. यामुळे वीजबिल शून्यावर येण्यास मदत होते, तसेच अतिरिक्त वीजनिर्मितीमुळे उत्पन्नही मिळते.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचे उद्दीष्ट ८२ दिवसांत पूर्ण
|