मनोरंजन

गदर-2 च्या टीमने अटारी बोर्डरवरील जवानांची घेतली भेट

The team of Ghadar 2 met the jawans at the Attari border


By nisha patil - 6/8/2023 6:31:54 PM
Share This News:



सनी देओल आणि अमीषा पटेल सध्या त्यांच्या 'गदर 2' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. सनी देओल, अमिषा पटेल आणि गदर-2 च्या टीमनं नुकतीच अटारी बोर्डरवरील जवानांची भेट घेतली. असून  त्यांच्या समवेत बऱ्याच लोकांनी बोर्डरवरील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सनी देओल यांनी अटारी बोर्डर येथे जवानांसोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच त्यांनी या फोटोला कॅप्शन दिलं कि, 'अटारी बॉर्डरवर रिट्रीट सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा मान मिळाला' अभिनेत्री अमिषा पटेलनं देखील अटारी बोर्डरवरील फोटो शेअर केले आहेत. तसेच प्रेक्षक वर्ग हा गदर २ या आगामी चित्रपटाची मोठ्या  वाट बघत आहेत.


गदर-2 च्या टीमने अटारी बोर्डरवरील जवानांची घेतली भेट