बातम्या
केशवराव भोसले नाटकगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील निविदा लवकरच जाहीर...
By nisha patil - 6/2/2025 7:23:58 PM
Share This News:
कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाटकगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा जाहीर करण्यास महापालिका प्रशासकीय के. मंजूलक्ष्मी यांनी मंजूर दिली आहे तीन कोटी बावीस लाख रुपये खर्चाची दुसऱ्या टप्प्यातील काम हे गतीने करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महापालिकेच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजूर देताच ही निविदा जाहीर केली जाणार आहे. नाट्यगृहाचा विषय अतिशय संवेदनशील असल्याने त्याच्या पुनर्बांधणीला 25 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील सात कोटीच्या कामांचा समावेश होता ही कामे गतीने सुरु असून दुसऱ्या टप्प्यातील काम हे अशा पद्धतीने सुरू व्हावीत व दुसऱ्या टप्प्यातील तीन कोटी 22 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव करण्यात आला आहे. त्यानंतर दोन दिवसातच निविदा निघण्याची शक्यता आहे
केशवराव भोसले नाटकगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील निविदा लवकरच जाहीर...
|