बातम्या

पाचगाव रोड शेजारील गार्डन मध्ये होणाऱ्या चोऱ्या थांबवाव्यात--तानाजी जाधव

The thefts in the garden adjacent to Pachgaon Road should be stoppedTanaji Jadhav


By nisha patil - 11/6/2024 8:14:16 PM
Share This News:



मानवाधिकारी सहाय्यता संघ आणि शहराध्यक्ष तानाजी आनंदराव जाधव यांनी आयटीआय ते पाचगाव रोड शेजारील जागेत लोकवर्गणीतून गार्डन विकसित करण्याचं काम सुरू केल आहे ही जागा गेले कित्येक दिवस पडून होती काही लोकांकडून मोडकळीस आलेली वाहने या ठिकाणी लावली जात आहेत होती त्याच बरोबर मदयप्राशन करण्याच ही या ठिकाणी प्रमाण वाढलं होतं या सर्व तक्रारी प्रशासनास सांगून देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं या त्रासाला कंटाळून या परिसरातील नागरिकांनी शेवटी हा परिसर आपणच स्वच्छ ठेवू या उद्देशाने लोकवर्गणीतून एक सुंदर गार्डन विकसित करण्याचे काम हाती घेतला आहे दरम्यान या गार्डन मधील काही विकृत लोकांकडून लाईट बल्ब शोभेची झाडे चोरली जात आहेत तसेच कोणाकडून इथून पुढे कृती होऊ नये यासाठी त्या गार्डनमध्ये 8x 6 बायचा विनंती अर्ज असलेला डिजिटल बोर्ड लावून चोरणाऱ्या व्यक्तीचा निषेध व्यक्त करण्याची विनामूल्य परवानगी मिळावी  असा अर्ज उपशहर अभियंता यांना देण्यात आला


पाचगाव रोड शेजारील गार्डन मध्ये होणाऱ्या चोऱ्या थांबवाव्यात--तानाजी जाधव