बातम्या

'1920 हॉरर ऑफ द हार्ट' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज

The thrilling trailer of 1920 Horror of the Heart is released


By nisha patil - 2/6/2023 4:02:42 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम  छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री अविका गोर    ही लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. अविका ही कृष्णा भट्टच्या '1920- हॉरर ऑफ द हार्ट'  या हॉरर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी  रिलीज झाला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 
2008 मध्ये रिलीज झालेल्या रजनीश दुग्गल आणि अदा शर्मा यांच्या '1920' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता लवकरच  '1920 हॉरर ऑफ द हार्ट' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्यामध्ये अविका कौर ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर कृष्णा भट्टने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.हा ट्रेलर शेअर करुन कृष्णा भट्टनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'ट्रेलर आला आहे.. भीतीच्या अंधारात असेच काहीसे घडते..'. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. '1920 हॉरर ऑफ द हार्ट'  हा चित्रपट 23 जूनला प्रदर्शित होत आहे.


'1920 हॉरर ऑफ द हार्ट' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज