बातम्या

कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गादी नाही ; संजय राऊत यांची टीका

The throne of Kolhapur is not the throne of Modi


By nisha patil - 4/27/2024 6:43:02 PM
Share This News:



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात संकल्प सभा  होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते आज उपस्थित लावणार आहेत. कोल्हापुरातील माहियूतीच्या दोन्ही नेत्यांच्य प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कोल्हापुरात असणार आहेत. पण याच दौऱ्याच्या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूर दौऱ्यवर येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे

शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगामी विचार दिले. जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावे, ही आमची भूमिका होती. कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती, तरी छत्रपती शाहू महाराजांसाठी आम्ही ती जागा सोडली. भाजप, नरेंद्र मोदी हे छत्रपती शाहू महाराजांविरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत महाराष्ट्रातली जनता हे कधीच विसरणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची  गादी नाही. गादीपुढे मोदी कोणीच नाही. भाजप त्या गादीचा अपमान करत असल्याचे ते म्हणाले.


कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गादी नाही ; संजय राऊत यांची टीका