बातम्या

सरकारला दिलेली वेळ संपली:मनोज जरांगे

The time given to the government is over Manoj Jarange


By nisha patil - 9/9/2023 7:46:54 PM
Share This News:



जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात गेल्या दहा दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे दरम्यान चार दिवसांपूर्वी त्यांनी सरकारला चार दिवसांची वेळ दिली असून त्यानंतर पाणी आणि  उपचार घेण्यास त्याग करणार असल्याचा इशारा दिला होता मात्र चार दिवसात आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही तोडगा निघाला नसून उद्यापासून  मी पाणी आणि उपचार घेण्यास त्याग करणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिल्या त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे दरम्यान याबाबत बोलताना जरांगे म्हणाले की माझं आमरण उपोषण आहे सरकारच्या सांगण्यावरून आतापर्यंत उपचाराने पाणी घेत होतो मात्र त्यांनी दिलेल्या मुदतिचा  आजचा शेवटचा दिवस आहे उद्या सकाळपासून अन्न पाणी  सरकारकडून सुरू असलेल्या उपचाराचे देखील मी त्याग करणार आहे सोबतच आता पुढील चर्चेसाठी जायचं की नाही याबाबतही आम्ही महाराष्ट्र पातळीवर आमची  एक बैठक येणार आहेत त्यात निर्णय घेतला जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत


सरकारला दिलेली वेळ संपली:मनोज जरांगे