बातम्या

काळंम्मा वाडी थेट पाईपलाईन योजनेच्या लोकार्पणाचा मुहूर्त अखेर ठरला

The time has finally been set for the inauguration of the Kalamma Wadi direct pipeline project


By nisha patil - 9/10/2023 4:48:09 PM
Share This News:



कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा  करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून दसरा ते दिवाळी या दरम्यान योजनेचे लोकार्पण करण्यात येईल अशी घोषणा पालकमंत्री  मुश्रीफ यांनी केले . 2010 ते 15 या काळात सत्तेत असलेल्या काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने कोल्हापूरकरांच्या स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठ्यासाठी 488 कोटीची काळमावाडी थेट पाईपलाईन योजना मंजूर केली होती आता या योजनेचे काम पूर्ण झालं असून दसऱ्या दिवशी काळबावाडी धरणातील पाणी जलवाहिनी द्वारे पूई खडी येथे जलशुद्धीकरण केंद्रात घेण्यात येईल त्यानंतर दसरा ते दिवाळी दरम्यान योजनेचे पाणी दिले जाणार आहे असं  पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा बैठकीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले त्याचबरोबर या योजनेचा लोकार्पणाचा मुहूर्त ही त्यांनी यावेळी सांगितला या या सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना निमंत्रित केल्या जाणाऱ्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं


काळंम्मा वाडी थेट पाईपलाईन योजनेच्या लोकार्पणाचा मुहूर्त अखेर ठरला