बातम्या

थड्याचीवाडीतील महागणपतीचा पारंपरिक रिंगण सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न*

The traditional arena ceremony of Mahaganapati in Thadachiwadi was held in an emotional atmosphere


By nisha patil - 9/18/2024 2:41:56 PM
Share This News:



भुदरगड तालुक्यातील थड्याचीवाडी गावातील नवसाला पावणारा महागणपतीचा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. या सोहळ्यादरम्यान गावकरी आणि भाविकांनी गणपती बाप्पाच्या जयघोषात, वाद्यांच्या गजरात उत्सव साजरा केला.

गणपती बाप्पाला निरोप देताना सर्वांच्या डोळ्यात भावनांचा पूर आलेला दिसला. रिंगण सोहळ्याच्या समाप्तीच्या वेळी भाविकांनी गणपती बाप्पाच्या चरणी श्रद्धेने वंदन केले आणि पुढील वर्षी परत येण्याचे आश्वासन दिले. सोहळ्याच्या वेळी संपूर्ण गाव भक्तिरसात न्हालले होते.


थड्याचीवाडीतील महागणपतीचा पारंपरिक रिंगण सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न*