बारावी पास चोर अवघ्या तीन मिनिटात लांबवतो कार

The twelfth pass thief delays the car in just three minutes


By nisha patil - 8/17/2023 6:56:27 PM
Share This News:



 बुलढाणा जिल्ह्यातील वाहन चोरी करणाऱ्या टोळीने चक्क हायटेक गाडीला अवघ्या तीन मिनिटात अनलॉक करून चोरी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.  बाजारात सध्या अनेक हाय सिक्युरिटी चारचाकी वाहनं आली असून, वाहन चोरीवर लगाम लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.विशेष म्हणजे यातील आरोपी पिता-पुत्रांना अटक केल्यावर, अख्ख कुटुंबच चोरीच्या व्यवसायात असल्याचं पोलीस तपासात समोर आलाय.तर हायटेक पध्दतीने काही मिनिटात गाडी लंपास करणारा आरोपी फक्त बारावी पास आहे.हा आरोपी सुरुवातीला ओबीडी नावाच्या डिव्हाईसने गाडीचं सेन्सर बंद करतो. त्यानंतर स्क्रू ड्रायव्हर आणि बनावट चावीच्या मदतीने चारचाकी वाहनांची अवघ्या तीन मिनिटात चोरी करतो.एखादी कार चोरायची असल्यास सुरवातीला हे आरोपी ओबीडी हे डिव्हाईस विकत घेतात.त्यानंतर कोणती गाडी चोरायची याची खात्री झाल्यावर हे चोर डिव्हाईसद्वारे-कारचे लॉक उघडतात.सोबतच या चोरांच्या टोळीकडून स्कू ड्रायव्हरच्या मदतीने कारचा दरवाजा खोलण्यात येतो.चारचाकी गाडीचा दरवाजा उघडल्यावर ओबीडी डिव्हाईस कारला कनेक्ट केले जाते.डिव्हाईस चारचाकी गाडीला कनेक्ट झाल्यानंतर कारचे सेन्सर बंद करण्यात येते.डिव्हाईस चारचाकी गाडीला कनेक्ट झाल्यानंतर कारचे सेन्सर बंद करण्यात येते.गाडीचे सेन्सर बंद झाल्यावर शेवटी बनावट चावी लावून कारची चोरी होते.
 


बारावी पास चोर अवघ्या तीन मिनिटात लांबवतो कार