बातम्या
आगामी निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शेवटची लढाई
By nisha patil - 11/10/2023 7:21:08 PM
Share This News:
आगामी निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शेवटची लढाई आहे, असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. गेल्या आठवड्यात चंद्रशेखर बावनकुळे कोल्हापूर दौऱ्यावर होते. बावनकुळे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला.
बावनकुळे म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडून शरद पवार यांच्याकडे गेले. शरद पवारांनी कुटुंब आणि जनतेलाही गृहित धरले. त्यामुळे ठाकरे आणि पवार एकाकी पडले. शरद पवार तर शेवटची लढाई लढत आहेत. पवारांकडे शिल्लक असलेले कार्यकर्ते आणि पक्ष शोधावा लागत आहे"
भाजपाचा विकासाच्या राजकारणावर विश्वास आहे. जो पक्ष विकास करू शकतो त्याच पक्षाच्या मागे लोक उभे राहतात. म्हणूनच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना समर्थक मिळत आहे. महायुतीमध्ये भाजपाची भूमिका मोठ्या भावाची आहे. आम्ही पक्षापेक्षा देशासाठी काम करणारे लोक आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे किंवा अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यात गैर काहीच नाही, असं बावनकुळे म्हणाले.
आगामी निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शेवटची लढाई
|