बातम्या

थांबवले टाँवरचे काम अचानक सुरु केल्याने हेर्लेत ग्रामस्थ आक्रमक

The villagers are aggressive because of the sudden start of the stopped tower work


By nisha patil - 5/4/2024 6:17:26 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी मौजे हेर्ले, ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथे गावहद्दीत गट नं 7ब मध्ये इंडस टॉवर कंपनीच्या मोबाईल टॉवरचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सदर बांधकामास यापूर्वी ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांनी विरोध दर्शवून सदरचे बांधकाम थांबवणे बाबत आंदोलनात्मक पवित्रा घेतल्यानंतर टॉवरचे बांधकाम थांबवण्यात आले होते परंतु दिनांक 04/04/2024 रोजी अचानक सदरच्या टॉवरचे बांधकाम पोलीस बंदोबस्तात करणार असल्याचे सांगत कंपनीच्या प्रतिनिधींनी कामकाज सुरू केले.
 

यावेळी परिसरातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी सदरचे बांधकाम थांबवण्याबाबत लेखी पत्र देऊनही टॉवर कंपनीच्या प्रतिनिधींनी जिल्हा परिषद प्रशासनाची परवानगी असल्याचे सांगून सदरचे बांधकाम थांबवण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा आदेश असेल तरच काम थांबवण्यात येईल अशा पद्धतीचे वक्तव्य करून जोर जबरदस्तीने कामकाजात सुरुवात केली आहे.
 

त्यामुळे तात्काळ ग्रामस्थ व ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी आपले कार्यालयाशी संपर्क साधला असता सदरच्या कंपनीस जिल्हा परिषद कडून कोणतेही परवानगी देण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सदरचे बांधकामाबाबत व परवाण्याबाबत संशयाची सुई फिरत असल्याकारणाने व सदरचे बांधकाम पासून उर्दू जिल्हा परिषद शाळा 100 मीटर च्या आत असून परवाना मागणी अर्जातील गट क्रमांक व प्रत्यक्ष बांधकाम सुरू असलेला गट क्रमांक वेगळा असल्याने सदरची टॉवर उभारणी करत असताना शासन निर्णयातील अटी व शर्तीचा भंग करून व शासनाची दिशाभूल करून
जोर जबरदस्तीने आचारसंहितेचा फायदा घेऊन करत असल्याचे दिसून येत असून सदरच्या टॉवर बांधकामास तात्काळ

 

स्थगिती देऊन सर्वसामान्य जनतेच्या मानवाधिकारांचे व घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करावे ही विनंती.अन्यथा कृती समिती या विरोधात कायदेभंग आंदोलन करून न्याय मागणीसाठी सत्याग्रह करेल व त्या सर्वस्वी आपण व शासन जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी.


थांबवले टाँवरचे काम अचानक सुरु केल्याने हेर्लेत ग्रामस्थ आक्रमक