बातम्या

महायुतीच्या आमदारांची मतं फुटणार....

The votes of the MLAs of Mahayuti will be divided


By nisha patil - 2/7/2024 7:46:53 PM
Share This News:



काहीवेळापूर्वीच विधानभवनात मिलिंद नार्वेकर यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे. मिलिंद नार्वेकर आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत मिलिंद नार्वेकर आणि प्रवीण दरेकर  विधानभवनात एका कोपऱ्यात जाऊन बोलताना दिसत आहेत. अगदी जन्मजन्मांतरीचे सख्य असल्याप्रमाणे दोन्ही नेते एकमेकांच्या गळ्यात हात टाकून काहीतरी बोलणी करताना व्हीडिओत स्पष्टपणे दिसत आहे. याशिवाय, मिलिंद नार्वेकर यांनी विधानभवनात भाजप आमदार आशिष शेलार यांची भेट घेतल्याचेही सांगितले जाते.  त्यामुळे आता मिलिंद नार्वेकर हे कोणकोणत्या आमदारांची मदत घेऊन विधानपरिषदेच्या 11 व्या जागेवरुन निवडून येण्याचा चमत्कार करुन दाखवणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


महायुतीच्या आमदारांची मतं फुटणार....