बातम्या

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'ची प्रतीक्षा अवघ्या दोनशे दिवसांवर

The wait for Allu Arjuns Pushpa 2 is just over two hundred days


By nisha patil - 1/29/2024 5:15:16 PM
Share This News:



दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या  'पुष्पा 2'  या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा 2' हा 2024 च्या बहुचर्चित सिनेमांपैकी एक आहे. आता या सिनेमाच्या रिलीजला फक्त 200 दिवस बाकी आहेत. 
 

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रूल' हा 2024 च्या बहुप्रतीक्षित सिनेमांपैकी एक आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता या सिनेमाच्या रिलीजला फक्त 200 दिवस बाकी आहेत. निर्मात्यांनी यासंदर्भात खास पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

'पुष्पा 2 : द रुल' या सिनेमाची निर्मिती माय थ्री या प्रोडक्शन हाऊसने केली आहे. या निर्मितीसंस्थेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केलं आहे. या पोस्टमध्ये सिनेमाच्या रिलीजला फक्त 200 दिवस बाकी आहेत, असं लिहिलेलं आहे. 'पुष्पा: द राईज'नंतर आता 'पुष्पा 2 : द रुल' हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी लिहिलं आहे,"पुष्पा राजला रूल करायला आता फक्त 200 दिवस बाकी आहेत. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा सिनेमा जगभरात प्रदर्शित होईल.

  पुष्पा 2' या सिनेमाची तगडी स्टारकास्ट आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अल्लू अर्जुन या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना  या सिनेमात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अभिनेता फहद फासिलदेखील या सिनेमाचा भाग असणार आहे. सुकुमारने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 
 

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या सिनेमाच्या रिलीजची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. अभिनेत्याच्या वाढदिवशी या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.


अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'ची प्रतीक्षा अवघ्या दोनशे दिवसांवर